For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंत्यसंस्कार करण्याची नवी पद्धत

07:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंत्यसंस्कार करण्याची नवी पद्धत
Advertisement

पाणी अन् क्षारीय मिश्रणात विरघळविण्याचा प्रकार

Advertisement

मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची परंपरा शतकांपासून चालत आलेली आहे. परंतु हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटाच्या काळात एक्वामेशन म्हणजेच पाण्याने अंत्यसंस्कार करण्याची नवी पद्धत चर्चेत आहे. यात मृतदेहाला पाणी आणि क्षारयुक्त मिश्रणात ‘उकळवून’ विरघळविले जाते, नरम हिस्सा तरल पदार्थात बदलतात, तर हाडांची राख तयार केली जाते. या पद्धतीत पारंपरिक प्रकाराच्या तुलनेत 90 टक्के कमी ऊर्जेचा वापर होतो आणि कुठलेच हानिकारक वायू उत्सर्जित होत नाहीत.

एक्वामेशनला अल्कलाइन हायड्रोलिसिस किंवा रेसोमेशनही म्हटले जाते. ही एक वैज्ञानिक प्रक्रिया असून यात मृतदेहाला स्टेनलेस स्टीलच्या दबावयुक्त सिलेंडरमध्ये ठेवण्यात येते. मग पाण्याचा 95 टक्के आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड (केओएच)5 टक्के मिश्रण टाकले जाते. तापमान 150 अंश सेल्सिअस आणि दबाव 10-20 एटमॉस्फियर ठेवले जाते. 3-16 तासांदरम्यान नरम पेशी, मांस, त्वचा, अवयव वितळून अमीनो अॅसिड, शर्करा, पेप्टाइड्स आणि सॉल्टसयुक्त बंध्य तरलात बदलतात. हे तरल इतके साफ असते की, सीव्हर सिस्टीमध्ये टाकता येते, कारण कुठलाच डीएनए शिल्लक राहत नाही. शिल्लक हाडे सुकविली जातात, 800-1000 अंशावर भाजवून त्यांची राख तयार केली जाते.

Advertisement

पर्यावरणस्नेही पद्धत

पर्यावरणीय लाभांमुळे याला ग्रीन क्रीमेशन म्हटले जातेय. पारंपरिक अग्निसंस्कारात 1.5 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो, तर मोठ्या प्रमाणात इंधन लागते. एक्वामेशनमध्ये केवळ 100 लिटर पाणी आणि विजेची गरज असते. म्हणजेच 90 टक्के कमी ऊर्जा. कॅनेडियन क्रीमेशन असोसिएशननुसार यामुळे ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन 35 टक्क्यांनी कमी होते. दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेसमंड टूटू यांनी 2022 मध्ये हा पर्याय निवडला, ते पर्यावरणप्रेमी होते. त्यांच्या अंत्यसंस्कारात ही पद्धत वापरली गेली. अमेरिकेत 28 प्रांतांमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे. तेथे दरवर्षी हजारो लोक स्वत:च्या अंत्यसंस्काराची ही पद्धत निवडत आहेत.

वेगाने होतेय प्रचलित

ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियातही ही पद्धत अवलंबिली जातेय. पेट एक्वामेशनचा बाजार 2024 मध्ये 845 दशलक्ष डॉलर्सचा होता, जो 2033 पर्यंत दुप्पट होणार आहे. परंतु भारतात एक्वामेशन अवैध आहे. तरीही पर्यावरण मंत्रालयाने 2023 मध्ये ग्रीन ब्युरियलवर चर्चा केली, ज्यात एक्वामेशन सामील होते.

Advertisement
Tags :

.