For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूरवरील ग्रहात नवा बर्फ

06:48 AM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
दूरवरील ग्रहात नवा बर्फ
Advertisement

अध्ययनात झाला प्लास्टिक आइसचा खुलासा

Advertisement

बर्फ देखील अनेक प्रकारचे असू शकतात का या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिकांच्या मतानुसार होय असे आहे. अलिकडेच एका संशोधनात वैज्ञानिकांनी एका एलियन ग्रहावर बर्फाचे नवे रुप पाहिले आहे. बर्फाचे अशाप्रकारचे स्वरुप आजवर पृथ्वीवर दिसून आले नसल्याने वैज्ञानिक थक्क झाले आहेत. हे संशोधन वैज्ञानिक सौरमंडळाबाहेरील ग्रहांची स्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मानत आहे. तर बर्फाच्या या स्वरुपाला वैज्ञानिक एकप्रकारचा प्लास्टिक बर्फ ठरवत आहेत. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचे तीन मूळ भौतिक स्वरुप किंवा अवस्था असतात. द्रव्य, ठोस अणि वायू. परंतु वैज्ञानिकांनी याचबरोबर आणखी काही अवस्थांची व्याख्या केली असून यात प्लाझ्मा किंवा बोस आइंस्टीन अवस्था देखील आहे. तर काही अवस्था तीन मूळ अवस्थांदरम्यानच्या असतात. याचपैकी एक प्लास्टिकची अवस्था असते. ज्यात द्रव्य अन् ठोसदरम्यानची अवस्था असते.

नव्या संशोधनातून पाणी अत्यंत टोकाच्या स्थितीत कशाप्रकारे स्वरुप बदलते हे दिसून आले. याचबरोबर अत्यंत दूरवरील ग्रह अ

Advertisement

न् चंद्रांमध्ये संरचना कशा असू शकतात हे कळले आहे. नेचर या नियतकालिकात प्रकाशित अध्ययनात सामान्य बर्फाच्या उलट प्लास्टिक आइस 7 निर्माण होण्यासाठी अत्यंत टोकाची परिस्थिती निर्माण व्हायला लागते. अशाप्रकारच्या अवस्थेसाठी वैज्ञानिकांनी यापूर्वी फ्रान्समध्ये प्रयोग केला होता, ज्यात पाण्याला वायुमंडळील दाबापेक्षा 60 हजार पट अधिक दबाव आणि 327 अंश सेल्सिअसच्या तापमानापर्यंत पोहोचविण्यात आले होते. या अवस्थेत हायड्रोजनच्या वर्तनामुळे वैज्ञानिकांसमोर कोडं निर्माण झाले होते.

17 वर्षांपूर्वी अनुमान

हायड्रोजनच्या अशाप्रकारच्या वर्तनाची ओळख पटवत वैज्ञानिक प्लास्टिक आइस 7 च्या अस्तित्वाबद्दल जाणू शकले. संशोधकांनी क्वासी-इलास्टिक न्यूट्रॉन स्कॅटरिंग पद्धतीने 17 वर्षे जुन्या अनुमानाची पुष्टी केली, ज्यात पाण्याच्या या अवस्थेत हायड्रोजनच्या खास वर्तनाविषयी नमूद करण्यात आले होते. अशाप्रकारचा बर्फ आमच्या सौरमंडळात नेपच्यून ग्रह आणि गुरुचा चंद्र युरोपा तसेच अन्य बर्फाळ पिंडांवरही असू शकतो. याद्वारे बर्फ आणि अनेक अवस्थांचा शोध लावता येईल असे वैज्ञानिकांना वाटत आहे.

Advertisement
Tags :

.