For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन हासन बटाटा आवक दाखल : रताळी दरात एक हजारंनी वाढ

06:10 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवीन हासन बटाटा आवक दाखल   रताळी दरात एक हजारंनी वाढ
Advertisement

गणेशचतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात यंदाच्या हंगामातील कर्नाटकातील हासन बटाटा प्रथमच विक्रीसाठी तीन ट्रक मार्केटयार्डमध्ये दाखल झाला आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात आवक येण्याची शक्यता आहे. तर रताळी आवकेत घट निर्माण झाल्याने रताळ्याचा भाव क्विंटलला 1 हजार रुपयांनी भडकला आहे. कांदा, बेळगाव जवारी बटाटा, आग्रा बटाटा, इंदोर बटाटा, गुळाचा भाव प्रतिक्विंटलला स्थिर आहे. दुसरीकडे भाजीमार्केटमध्ये पालेभाज्यांसह इतर भाज्यांचे दर थोड्या प्रमाणात वाढले आहेत. कोथिंबीरची आवक मंदावल्याने कोथिंबीरचा देखील दर भडकला असून शेकडा भाव 3500 रुपयांपासून ते 4500 रुपयांपर्यंत झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा परिणाम होत आहे.Potato-onion price stable

Advertisement

बेळगाव तालुक्याच्या बटाटा आवकेपाठोपाठ आता हासन बटाटादेखील मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. यामुळे खरेदीदार नवीन बेळगाव व हासन बटाटा खेरदीकडे वळले आहेत. परराज्यातील इंदोर बटाटा आणि आग्रा बटाटा मागणीत घट निर्माण झाली आहे. यामुळे व्यापारी मागणीनुसारच इंदौर आग्रा बटाटा मागविण्यात येत आहे. तर दुसरीकडे अल्पप्रमाणात कर्नाटकातील नवीन कांदा देखील विक्रीसाठी दाखल होत आहे. गणेश चतुर्थीनंतर नवीन कर्नाटक कांदा आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

हासन बटाटा विक्रीसाठी दाखल

दरवर्षाप्रमाणे हासन जिल्ह्यामधील नवीन बटाटा आवक विक्रीसाठी मार्केटयार्डमध्ये दाखल झाला होता. एकूण तीन ट्रका दाखल झाल्या होत्या. लक्ष्मीनारायण ट्रेडर्समध्ये एक ट्रक आणि दीपक ट्रेडर्समध्ये एक ट्रक बटाटा विक्रीसाठी आला होता. हासनमध्ये बटाटा काढणी करताच त्वरित बटाटा विक्रीसाठी बेंगळूर, बेळगाव, हुबळीसह इतर बाजारपेठेमध्ये शेतकरी घेऊन येतात. त्याचप्रमाणे यंदाच्या हंगामामधील हासन बटाटा बेळगाव मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी आला आहे. याचा क्विंटल भाव 800 पासून ते 3250 रुपयांपर्यंत झाला आहे, अशी माहिती लक्ष्मी-नारायण ट्रेडर्सचे मालक राजू पाटील यांनी दिली.

रताळी भाव 1000 रुपयांनी वधारला

बेळगाव तालुक्यामध्ये आणि खानापूर तालुक्यामध्ये रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र पाऊस अधून-मधून दिवसभर पडत आहे. यामुळे रताळी काढणीला अडथळा निर्माण झाला आहे. जमिनी ओल्या असल्यामुळे रताळी काढणीला अडथळा झाला आहे. यामुळे रताळी आवक मार्केटयार्डमध्ये थोड्या प्रमाणात येत आहे. तर दुसरीकडे इतर जिल्ह्यामध्ये पावसामुळे रताळी उत्पादन खराब झाले आहे. यामुळे परराज्यातील खरेदीदार बेळगाव जिल्ह्यामधील रताळी खरेदीकडे वळले आहेत. रताळ्याला दिल्ली, मुंबईहून मागणी येत आहे. मलकापुरी रताळ्याचा भाव 4000-5100 रुपये भाव झाला. तर साधी रताळ्याचा भाव 2000-3000 रुपयांपर्यंत झाला आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.Export ban on onion, restriction on wheat storage

कांदा-बटाटा भाव स्थिर

महाराष्ट्र कांदा, कर्नाटकातील कांदा, इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, बेळगाव जवारी बटाटा भाव क्विंटलला स्थिर आहे. कर्नाटक कांदा भाव 3000-4200 रुपये तर महाराष्ट्र कांदा भाव 3000-4300 रुपये, इंदोर बटाटा 2000-3200 रुपये, आग्रा बटाटा 2500-2900 रुपये, बेळगाव जवारी बटाटा 500-3500 रुपये, गुळाचा भाव 5000-5500 रुपये झाला आहे. पांढऱ्या कांद्याचा भाव 3000-6000 रुपये, हासन बटाटा भाव 800-3250 रुपयेप्रमाणे क्विंटल भाव झाला आहे. महाराष्ट्र कांदा गेल्या 15 दिवसांपासून वाढला आहे. तोच भाव सध्या बाजारात टिकून आहे. जानेवारी महिन्यामध्ये नवीन महाराष्ट्र कांदा आवकेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.Onion, potato and yam prices remained stable per quintal

भाजीपाल्यांच्या दरात वाढ

कांदा, बटाटा, रताळ्याच्या पाठोपाठ आता पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतवाडीमध्ये पाणी तुंबून भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे भाजीमार्केटमध्ये आवकेत दिवसेंदिवस घट निर्माण होत आहे. आता गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. गोवा आणि कोकणपट्ट्यामध्ये गणेश चतुर्थीला भाजीपाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. कोथिंबीर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कोथिंबीरचा भाव शेकडा 3500-4500 रुपये झाला आहे. पालक, मेथी, शेपू, पुदीना, दोडकी, मटर, मुळा यांच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.