For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होम-स्टे, रिसॉर्टसाठी नवी मार्गसूची

06:22 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
होम स्टे  रिसॉर्टसाठी नवी मार्गसूची
Advertisement

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कोप्पळ जिल्ह्यात 6 मार्च रोजी ओडिशातील एका प्रवाशाचा खून आणि इस्त्रायली महिलेसह दोघांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकार पर्यटकांच्या सुरक्षेसंबंधी कठोर उपाययोजना केल्या आहेत. सरकारने मंगळवारी होम-स्टे, रिसॉर्ट आणि हॉटेलसाठी नवी मार्गसूची जारी केली आहे.

Advertisement

अतिथींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोप्पळ जिल्ह्याच्या सानापूर येथील घटना दु:खद आणि खेदजनक असल्याचे सरकारने आदेशात म्हटले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.

राज्यभरात पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असणारे होम-स्टेनी विदेशी पर्यटकांसह सर्व पर्यटकांसाठी योग्य आणि पुरेशा सुरक्षा उपाययोजना कराव्यात. पर्यटकांना दुर्गम किंवा निर्जन भागात घेऊन जाण्यापूर्वी पूर्वकल्पना द्यावी, तसेच संबंधित पोलीस स्थानकाकडून परवानगी घ्यावी. पोलीस किंवा वनखात्याकडून पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय दुर्गम भागात, दूरवरील ठिकाणी किंवा वनभागात नेले तर वन्यप्राणी किंवा गुन्हेगारांकडून होणाऱ्या कोणत्याही घटनेला होम-स्टे मालक जबाबदार असतील. शिवाय कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.

होम-स्टे, हॉटेल व रिसॉर्टकडून मार्गसूचीचे पालन होत असल्याबद्दल जिल्हा प्रशासनांनी खातरजमा करावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. संभाव्य धोके आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडे ठिकाणच्या भेटी कार्यक्रमाविषयी यादी सादर करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.