सोशल मिडीया अकाऊंटसाठी सरकारच्या नवीन अटी
अकाऊंटसाठी लागणार सरकारची परवानगी
सोशल मिडीया आणि त्यावरचे आयुष्य हे एक वेगळेचं जग आहे. सध्याच्या पिढीचं आयुष्य या सोशल मिडीयाच्या अवतीभवती झालेलं आहे. देशात तरुणाई बरोबर सर्वांना या सोशल मिडीयाने भूरळ घातलेली आहे. देशात सोशल मिडीया वापरणारी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर सोशल मिडीया वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये डिजीटल पर्सनल डेटा संरक्षण हा नवीन कायदा मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत देशात सोशल मिडीयाशी निगडीत नवीन नियम बनविण्यात येणार आहेत. या कायद्यानुसार १८ वर्षाखालील मुलांना सोशल मिडीया वापरण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नवीन डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमानुसार अल्पवयीन मुलांसाठी सोशल मिडीयावर अकाऊंट उघडणे सोपे राहिलेले नाही. यासाठी या अल्पवयीन मुलांना आपल्या आई वडिलांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आई- वडिलांची परवानगी घेण्यासाठी डिजीटल टोकनचाही वापर केला जाणार आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणावर माहीती उपलब्ध होत आहे. या माहितीवर कोणतंही बंधन नाही. त्यामुळे मुलांच्या नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. अशात सोशल मिडीयावर खाते सुरु करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसल्याने १८ वर्षाखालील मुलेही अगदी सहजपणे सोशल मिडीया वर अकाऊंट खोलत होती. अल्पवयीन मुलांना सोशल मिडीयावर सहज अकाऊंट उघडता येऊ नये. यासाठी आता अल्पवयीन मुलांना अटी पूर्ण कराव्या लागतील . तर पालकांची परवानगी घेणेही बंधनकारक ठरेल. असे या नवीन नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
डीजीटल टोकन
इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रायलाच्या मते, अकाऊंटच्या पडताळणीच्या वेळी डिजीटल डेटा वापरून तात्पुरते असे आभासी टोकन तयार केले जाईल. या मसुद्यानुसार अल्पवयीन घोषित केल्यावर मुलांना पालकांची संमती बंधनकारक असेल. तरी जर मुलाला खाते तयार करायचे असेल, तर तो त्याचे वय कमी का घोषित करेल ? अशी मते तज्ज्ञांनी यावर व्यक्त केलेली आहेत.