ओप्पोचा रेनो-13 स्मार्टफोन होणार 9 तारखेस लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील स्मार्टफोन कंपनी ओप्पो यांचा नवा रेनो 13 स्मार्टफोन 9 जानेवारीला भारतात लॉन्च केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित टूल्स या मोबाईलमध्ये देण्यात आले असून 5800 एमएएच बॅटरी दिली जाणार आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील या फोनमध्ये दिला जाणार असून 80 डब्ल्यूचा वायर आणि 50 डब्ल्यूचा वायरलेस चार्जर दिला जाणार आहे. रेनो 13 आणि रेनो 13 प्रो हे दोन फोन्स कंपनी सादर करणार आहे.
यामध्ये मीडियाटेक डायमनसिटी 8350 ची चिप दिली असून ट्रिपल कॅमेराची सोय करण्यात आली आहे. विस्ताराने पाहिल्यास 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. 16 जीबी रॅम आणि 1 टीबीपर्यंतची स्टोरेजची सोय यामध्ये असेल. 6.83 इंचाचा अमोलेड डिस्प्ले याला दिला गेला आहे.
थोडक्यात वैशिष्ट्यो..
किंमत 40 हजाराच्या घरात
6.83 इंचाचा अमोलेड डिस्प्ले
फ्रंट कॅमेरा 50 एमपी, 50 एमपीचा टेलीफोटो कॅमेरा
मीडियाटेक डायमनसिटी 8350 चिप
5800 एमएएचची बॅटरी
16 जीबी रॅम-1 टीबी स्टोरेज