For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नखरेवालीमध्ये दिसणार नवे चेहरे

06:01 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
नखरेवालीमध्ये दिसणार नवे चेहरे
Advertisement

आनंद एल. राय यांचा चित्रपट

Advertisement

बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक आनंद एल. राय यांना रोमँटिक कॉमेडी चित्रपटांसाठी ओळख्घ्ले जाते. रांझना, तनू वेड्स मनु, रक्षाबंधन, अतरंगी रे आणि झिरो यासारखे चित्रपट आतापर्यंत त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारले आहेत. परंतु यातील काही हिट तर काही फ्लॉप ठरले. आनंद एल. राय आता पुन्हा एकदा नवी प्रेमकथा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘नखरेवाली’ असून याचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

नखरेवाली हा चित्रपट पुढील वर्षी 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहे. दोघांचेही पोस्टर शेअर करण्यात आले आहे. हे दोन्ही नवे चेहरे असून ते पहिल्यांदाच राय यांच्या चित्रपटात दिसून येणार आहेत.

Advertisement

आनंद एल राय याचे कलर येलो प्रॉडक्शन्स आणि जियो स्टुडिओजकडून याची निर्मिती केली जाणार आहे. हा चित्रपट मनोरंजन आणि हास्याने नटलेला असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल शांकल्या करणार आहेत. तर याची कहाणी दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे.

Advertisement
Tags :

.