गोल्फ संघटनेची नूतन कार्यकारिणी
अध्यक्षपदी एन. जे. शिवकुमार, सचिवपदी डॉ. दास्तीकोप
बेळगाव : बेळगाव गोल्फ संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून एन. जे. शिवकुमार यांची अध्यक्षपदी तर डॉ. विनय दास्तीकोप यांची सचिवपदी निवड करण्यात आली. देसूर येथील बी.जी.ए. गोल्फ मैदानाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड झाली. कॅप्टन व्ही. सुरेश, खजिनदार शशी सिद्धनाळ, संचालक सचिन सबनीस, तुषार पाटील, उत्तम चांडक, रघू कुलकर्णी, प्रवीण सरनायक, मिहीर पोतदार यांची निवड करण्यात आली. रमेश चौगुले-गोवा यांची क्लबच्या पॅट्रॉनपदी निवड करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष एन. जे. शिवकुमार यांनी निवृत्त आयएएस अधिकारी बेवीस कुटिनो व ओमप्रकाश यांनी हे गोल्फ मैदान करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या यशामुळेच हे गोल्फ मैदान पूर्ण झाले आहे. त्यांच्या प्रेरणेनेच ही संघटना स्थापन झाली असून ती कायमस्वरुपी राहणार आहे. देसूरचे गोल्फ मैदान स्थापन करण्यासाठी विभागीय प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सहकार्यामुळेच हे मैदान उभे आहे. यावेळी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या.