नवीन ड्रेनेज लाईन कामाला नवी गल्ली शहापूर येथे सुरुवात
11:32 AM Apr 26, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : नवी गल्ली शहापूर येथे नवीन ड्रेनेज लाईनची समस्या अखेर मार्गी लागणार आहे. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेच्या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे गल्लीतील रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रभाग क्र. 27 मध्ये येणाऱ्या नवी गल्ली शहापूर येथे ड्रेनेज लाईन नव्हती. त्यामुळे रहिवाशांना समस्येला तोंड द्यावे लागत होते. याबाबत रहिवाशांनी नगरसेवक रवी साळुंखे यांच्याकडे ड्रेनेज लाईन घालून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगरसेवक रवी साळुंखे यांनी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून ड्रेनेज लाईन घालण्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामधून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article