कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आशियाई क्रिकेट मंडळ, ‘पीसीबी’दरम्यान नवा वाद

06:27 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आशिया चषकावेळी आलेला अतिरिक्त खर्च देण्याची पाकिस्तान क्रिकेट मंडळाची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सहयजमान श्रीलंकेसह आयोजित केलेल्या आशिया चषकावेळी पाकिस्तान व श्रीलंकेदरम्यान चार्टर्ड विमानांच्या उ•ाणांची व्यवस्था करावी लागल्यास्तव अतिरिक्त नुकसान भरपाईची मागणी मंगळवारी केल्यामुळे त्यांच्यात आणि आशियाई क्रिकेट मंडळात (एसीसी) नवीन कोंडी निर्माण झाली आहे. ‘एसीसी’ने ‘पीसीबी’चा संकरित मॉडेल स्वीकारल्यानंतर यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये करण्यात आले होते. बहुतेक सामने श्रीलंकेत आयोजित केले होते.

‘पीसीबी’मधील एका विश्वासार्ह सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेच्या आयोजनाचे शुल्क, जे सुमारे अडीच लाख डॉलर्स इतके भरते तसेच तिकीटविक्री आणि पुरस्कारिता शुल्क यातील वाटा मागण्याव्यतिरिक्त त्यांनी अतिरिक्त भरपाईची देखील मागणी केली आहे. सूत्राने सांगितले की, हे अतिरिक्त पैसे पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान संघांसाठी चार्टर्ड विमानांची भाड्याने व्यवस्था करण्यावर तसेच अतिरिक्त हॉटेल आणि वाहतूक शुल्कावर जी जादा रक्कम खर्च करावी लागली त्यासाठी मागण्यात आले आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या सुऊवातीच्या अंदाजपत्रकात त्यांचा समावेश नव्हता, याकडे त्याने लक्ष वेधले.

तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसीसी’ ‘पीसीबी’ला अतिरिक्त खर्च देण्यास तयार नाही. कारण त्यांच्या मतानुसार, पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेचे चार सामने मायदेशी आयोजित करण्याच्या बदल्यात श्रीलंकेत संकरित मॉडेलनुसार सामने आयोजित करण्यास मान्यता दिली होती. ‘क्लासिक ट्रॅव्हल’ नावाच्या एका श्रीलंकास्थित कंपनीला पाकिस्तान आणि श्रीलंकेददरम्यान चार चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था करण्यासाठी 2 लाख 81 हजार डॉलर्स दिले गेले. ‘पीसीबी’च्या क्रिकेट व्यवस्थापन समितीला (सीएमसी) सदर पैसे आगाऊ देण्याची कल्पना रुचली नव्हती.

भारताने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर ही स्पर्धा संकरित मॉडेलमध्ये आयोजित करण्याची कल्पना पुढे आली होती. पाकिस्तानने सुऊवातीला फक्त चार सामन्यांचे आयोजन केलेले असले, तरी ‘सीएमसी’ प्रमुख झाका अश्रफ यांनी त्यापैकी एक सामना लाहोरहून त्यांच्या मूळ गावाजवळील मुलतान येथे हलवल्यामुळे खर्च वाढला. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘एसीसी’ने श्रीलंकेत सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘पीसीबी’ला चार्टर्ड फ्लाइटवर आणि इतर जो अतिरिक्त खर्च उचलावा लागला त्याची भरपाई करण्याची जबाबदारी त्यांची होती.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, आशिया चषकापूर्वी श्रीलंकेत अफगाणिस्तानविऊद्ध खेळलेला पाकिस्तानचा संघ आशिया चषकासाठी मायदेशी परतणार होता. परंतु बहुतांश स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यात आल्याने ‘पीसीबी’ला पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेदरम्यान चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था करावी लागली. या विमान उ•ाणांची व्यवस्था करणाऱ्या कंपनीने चार चार्टर्ड फ्लाइट्ससाठी 2 लाख 81 हजार 700 डॉलर्सचा दर सांगितला होता आणि सर्व पैसे आगाऊ  देण्याची मागणी केली होती. ‘पीसीबी’ने सदर चार्टर्ड विमानांतील रिकाम्या जागा चाहत्यांना विकण्याचाही विचार केला होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ही कल्पना रद्द करण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat#Sport
Next Article