For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात दुर्गामाता दौडमुळे नवचैतन्य

10:44 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात दुर्गामाता दौडमुळे नवचैतन्य
Advertisement

विविध गावांमध्ये दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ :  युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग : ध्येयमंत्र-प्रेरणामंत्राने गावे दुमदुमली 

Advertisement

वार्ताहर/किणये

तालुक्याच्या विविध गावांमध्ये गुऊवारी पहाटे दुर्गामाता दौडला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. दौडमुळे गावांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दौडच्या माध्यमातून तऊणाई एकवटली असून, अनेक गावांमध्ये जल्लोषात दौडला प्रारंभ करण्यात आला. तरुण व तरुणींनी अंगावर पांढरा कुर्ता परिधान केला होता. डोक्यावर भगवे फेटे व पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. यामुळे अनेक गावांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. गावातील जागृत मंदिरांमध्ये शस्त्रपूजा, ध्वजपूजन करून ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र झाल्यानंतर दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली.

Advertisement

दौडमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे गावे दणाणून गेली होती. कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन दौडची रुपरेषा ठरविली. गुरुवारी दुर्गामाता दौडला सुरुवात होणार असल्यामुळे बुधवारी रात्री उशिरापर्यंत गल्ल्यांमध्ये सजावटीचे काम तरुण वर्ग करताना दिसून आला. दौडनिमित्त आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या. दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी फलक लावले आहेत. त्यामुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे.

मच्छेत दौड जल्लोषात

मच्छे गावातील ब्रह्मलिंग मंदिरापासून दुर्गामाता दौडला सुऊवात करण्यात आली. देवस्थान पंच कमिटीच्या हस्ते शस्त्रपूजन व ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या जल्लोषात गावात दौड निघाली.

हलगा येथे दौडला प्रारंभ

हलगा गावात उत्साहात दौडला प्रारंभ झाला आहे. गेल्या 22 वर्षापासून या गावात दुर्गामाता दौड सुरू आहे. गुरुवारी दौडमध्ये हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. ध्वज व शस्त्रपूजन हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे सीपीआय तुकाराम नीलगार यांच्या हस्ते करून दौडला सुरुवात केली. भेंडीगिरीत दौडचे जल्लोषात स्वागत केले. सावगाव येथील दौडमध्ये तरुणांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. मान्यवरांच्या हस्ते ध्वज व शस्त्रपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजनही केले. यावेळी दौडचे महत्त्व व शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांनी कशा पद्धतीने घ्यावा याबद्दल मान्यवरांची भाषणे झाली. महिलांनी आरती ओवाळून दौडचे स्वागत केले.

Advertisement
Tags :

.