आविष्कार संशोधन स्पर्धेत न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये न्यू कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये ऑग्रीकल्चर विभागातून विघ्नेश पाटीलने (इलेक्ट्रॉनिक्स विभाग) प्रथम क्रमांक पटकावला. इंजीनियरिंग व टेक्नॉलॉजी विभागातून दीक्षा घोसरवाडेने (इलेक्ट्रॉनिक विभाग) प्रथम क्रमांक पटकावला. तर कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागातून श्रावणी गुरवने द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, तसेच डॉ. सुनील लवटे, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक विनय पाटील, आविष्कार समिती प्रमुख डॉ. अर्चना कांबळे (जगतकर), प्रा. सरोज देशमुख, प्रबंधक एम. वाय. कांबळे, डॉ. के.डी. अत्तार, एस. जे. चव्हाण, डॉ. डी. जी. गोडसे आदी उपस्थित होते.