कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंटमध्ये बांधकामासाठी नवा बायलॉज

11:30 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत निर्णय : बिल्डींग एफएसआयमध्येही वाढ

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने नवीन बिल्डींग बायलॉज तयार केले आहे. ग्राऊंड फ्लोअर व त्यावर दोन मजली इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. 18 मीटर उंच इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी यापुढे दिली जाणार आहे. पुणे येथील जेओसी कार्यालयाने काही बदल सुचवले होते. ते बदल करून नवीन बायलॉज तयार करण्यात आल्याची माहिती गुरुवारी आयोजित कॅन्टोन्मेंट बैठकीत देण्यात आली. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची विशेष बैठक गुरुवारी पार पडली. कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार व सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट एरियामध्ये नव्या इमारतीचे बांधकाम करताना अनेक जाचक अटी होत्या.

Advertisement

त्या काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न नवीन बायलॉजमधून करण्यात आला आहे. त्याचबरोबर धोकादायक झाडे हटविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. काही झाडे घरांवर पडून नुकसान होऊ शकते. त्यामुळे निविदा मागविण्यात आल्या असून लवकरच 33 झाडे तोडण्यात येणार आहेत. यासाठी 2 लाख 16 हजार रुपये निधी निश्चित करण्यात आला. केंद्र सरकारकडून देशातील महत्त्वाच्या शहरांना अलर्ट देण्यात आला आहे. बेळगावमध्येही संरक्षण दलाने अनेक ठिकाणी सुरक्षा वाढविली आहे. कॅन्टोन्मेंटसह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लक्ष्मीटेकडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली. सार्वजनिक बांधकाम खाते अथवा एलअॅण्डटी प्रशासनाला पत्र लिहून सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

एफएसआयमध्ये वाढ

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सूचनेनुसार एफएसआयमध्ये वाढ करण्यात आली आहे. सिव्हिल एरिया व बाजारपेठेसाठी यापूर्वी एक एफएसआय होता. वाढते शहरीकरण पाहता 2.5 एफएसआय करावा, अशी मागणी कॅन्टोन्मेंटने जेओसी कार्यालयाकडे केली होती. परंतु, त्यांनी एफएसआय-2 निश्चित केला आहे. तर बंगलो एरियासाठी 0.5 एफएसआय पूर्वीप्रमाणेच लागू करण्यात आला आहे.

कॅन्टोन्मेंट शाळेच्या निकालावरून ब्रिगेडियर नाराज

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये इंग्रजी, मराठी व ऊर्दू माध्यमांचे हायस्कूल आहेत. निकाल वाढीसाठी मागील वर्षभरापासून शाळांमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात आले. परंतु, यावर्षीचा निकाल हवा तसा लागला नसल्याने ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यापुढे शाळा व शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र कमिटी करण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व पालकांचा समावेश करण्यात येणार आहे. कामचुकार शिक्षकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article