महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेसरी पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील म्होरक्यासह चौघे जेरबंद

04:29 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur Crime
Advertisement

१० मोटरसायकल, विद्युत मोटरसह ४ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त; नेसरी पोलिसांची दमदार कामगिरी

नेसरी / वार्ताहर

नेसरी पोलिसांकडून बेळगाव कर्नाटक येथील रेकॉर्ड वरील आंतरराज्य टोळीतील अक्षय चौगुले (वय २६ रा. मच्छे जिल्हा बेळगाव) यासह महादेव रघुनाथ पाटील (वय १९ रा. सांबरे ता. गडहिंग्लज), पांडुरंग नाईक (वय २१ राहणार पोरेवाडी-आमरोळी ता. चंदगड), अजय नाईक (वय २५ बेळगुंदी जिल्हा बेळगाव), रोहित लाड वय २२ रा. मच्छे जिल्हा बेळगाव) या पाच जणांकडून दहा मोटरसायकल सह पाण्यातील विद्युत मोटर चोरी प्रकरणी ४ लाख ७९ हजारांच्या मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आले आहे. याबाबतचा गुन्हा नेसरी पोलिसात नोंद करून पुढील तपास गतीने सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक कमलसिंग रजपूत यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली.

Advertisement

संशयित आरोपींकडून अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून बेळगाव, खानापूर, वडगाव, मच्छे या भागातील एकूण दहा मोटरसायकल चोरून त्या साथीदारांच्या कडे विक्री करता दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याने अक्षय चौगुले या आंतरराज्य टोळीतील म्होरक्यासह चौघांना नेसरी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून अधिक तपास केला जात आहे. याबाबत नेसरी पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे. कर्नाटकातील रेकॉर्डवर असलेला अक्षय चौगुले यांनी याआधी कर्नाटका ४० हून अधिक मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले असल्याचे सगळे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले या निमित्ताने परिसरातील घडलेल्या अनेक चोऱ्या ही उघडकीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#kolhapur crimegang leaderNesri Police
Next Article