महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेपाळमधील प्रचंड सरकार संकटात

06:47 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत समर्थक देउबा अन् चीनसमर्थक ओली एकत्र येणार

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

Advertisement

नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पदहल कमल उर्फ प्रचंड आणि त्यांच्या पक्षाचे सरकार संकटात सापडले आहे. नेपाळी काँग्रेस आणि नेपाळी कम्युनिस्ट पार्टी-एकीकृत मार्क्सवादी लेनिनवादी (सीपीएन-युएमएल)च्या नेत्यांदरम्यान बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर प्रचंड सरकार कोसळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेतील दोन सर्वात मोठे पक्ष प्रचंड यांना सत्तेवरून हटवून सरकारचे नेतृत्व स्वत:च्या हातात घेण्याची तयारी करत असल्याचे मानले जातेय. चार महिन्यांपूर्वीच केपी शर्मा ओली यांच्या सीपीएन-युएमएल सत्तारुढ आघाडीत सामील झाली होती. प्रचंड यांनी मार्च महिन्याच्या प्रारंभी बहादुर देउबा यांच्या नेपाळी काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आणत ओली यांच्याशी हातमिळवणी केली होती.

ओली यांनी अलिकडेच सरकारकडून सादर अर्थसंकल्पावर जाहीरपणे टीका केली होती. या अर्थसंकल्पाला त्यांनी ‘माओवादी बजेट’ संबोधिले होते. ओ#socialली यांच्यासोबतच्या बैठकीत देउबा यांच्यासह त्यांच्या खासदार पत्नी आरजू राणा देखील उपस्थित होत्या. वर्तमान स्थितीत देश चालविला जाऊ शकत नसल्याचे ओली यांनी म्हटले आहे. ओली आणि देउबा यांनी निष्क्रीय संघवाद आणि निवडणूक प्रणालीची समीक्षा करणे तसेच आवश्यक बदलांविषयी व्यापक जनसमर्थन तयार करण्यावय सहमती दर्शविली असल्याचे समजते.

 एकत्र येण्यावर सहमत

दोन्ही पक्ष सभागृहाच्या उर्वरित 32 महिन्यांच्या कार्यकाळासाठी आघाडीचे नेतृत्व करण्यावर सहमत झाले आहेत. परंतु पहिल्या निम्म्या कार्यकाळासाठी नेतृत्व कोण करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे प्रमुख  रवि लाबिछाने देखील प्रचंड सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेणार असल्याचे समजते. ओली आणि देउबा या दोन्ही माजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय राजकारण, दशकांपासून अपूर्ण असलेली संक्रमणकालीन न्याय प्रक्रिया आणि अन्य राष्ट्रीय मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी संभाव्य सहकार्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे नेपाळी काँग्रेसचे नेते मीन बहादुर विश्वकर्मा यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article