महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेहा शर्मा विदेशी खेळाडूच्या प्रेमात

06:54 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर सदैव सक्रीय असते. नेहा आता स्वत:च्या रिलेशनशिपवरून चर्चेत आली आहे. 37 वर्षीय नेहा अलिकडेच एका मिस्ट्री मॅनसोबत दिसून आली आहे. याच युवकासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

नेहा शर्मासोबत दिसून आलेला युवक क्रोएशियन फुटबॉल स्टार पीटर स्लिसकोविक आहे. बोस्नियात जन्मलेला पीटर  सध्या 33 वर्षांचा असून मागील 13 वर्षांपासून फुटबॉलविश्वात सक्रीय आहे. चेन्नईयिन एफसी आणि जमशेदपूर एफसीसाठी तो इंडियन सुपर लीगमध्ये खेळला आहे. पीटर हा सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरीही त्याला हजारो लोक फॉलो करतात. यात नेहा शर्माचाही समावेश आहे.

Advertisement

नेहा किंवा पीटर यांच्यापैकी कुणीच स्वत:च्या डेटिंगबद्दल पुष्टी दिलेली नाही तसेच दोघांनीही आपण नातेसंबंधात नसल्याचाही दावा केलेला नाही. नेहा शर्मा ही बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरली नसली तरीही ती सोशल मीडियावर चर्चेत असते. स्वत:ची छायाचित्रे शेअर करत ती चाहत्यांची संख्या वाढवत असते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article