राकेश मारियांच्या बायोपिकमध्ये जॉन
चालू वर्षात सुरू होणार चित्रिकरण
मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यांमध्ये सामील मोस्ट वाँटेड दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा अलिकडेच पाकिस्तानात मृत्यू झाला. तर या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना भिडणारे सुपरकॉप राकेश मारिया यांचा आता बायोपिक येत आहे. या बायोपिकमध्sय जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहे.
जॉन हा बॉलिवूडमधील अॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो, फोर्स, परमाणु, बाटला हाउस, सत्यमेव जयते यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने हाय-ऑक्टेन अॅक्शन केली आहे. तर पठान चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेद्वारेही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता तो भारतीय पोलीस अधिकारी राकेश मारिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, जावेरी बाजार स्फोट आणि 26/11 हल्ल्याच्या तपासाला दाखविले जाणा आहे. राकेश मारिया हे मुंबईच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक राहिले आहेत. राकेश मारिया हे 1981 ते 2017 पर्यंत स्वत:च्या कार्यकाळात अनेक दहशतवाद्यांना पकडण्यास यशस्वी ठरले आहेत.
हा बायोपिक चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चित्रित होणार आहे. परंतु याच्या दिग्दर्शकाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. चित्रपटात राकेश मारिया यांचा पोलीस उपायुक्तापासून महासंचालक होण्यापर्यंतचा प्रवास दाखविला जाणार आहे. जॉन अब्राहम याचबरोबर तेहरान आणि डिप्लोमॅट या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत आहे.