महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘36 डेज’मध्ये नेहा शर्मा

06:01 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

थ्रिलर वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका

Advertisement

अभिनेत्री नेहा शर्माने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रीत केले आहे. इलिगल आणि शायनिंग विद द शर्मा या वेबसीरिजनंतर नेहा सध्या ‘36 डेज-सीक्रेट इज इंजूरियस टू हेल्थ’मुळे चर्चेत आहे. तिच्या या थ्रिलर वेबसीरिजचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला असुन यातील तिच्या बोल्ड लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisement

या सीरिजमध्ये नेहाने ‘फराह’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘प्रत्येक कहाणीचे तीन पैलू असतात, तुमची साइड, माझी साइड आणि सत्य, परंतु सत्य भिंतीआड लपले असेल तेव्हा काय घडेल’ असे निर्मात्यांनी याचा ट्रेलर शेअर करत कॅप्शनदाखल नमूद केले आहे.

या वेबसीरिजमध्ये नेहा शर्मासोबत पूरब कोहली, श्रुती सेठ, चंदन रॉय सान्याल, शारिब हाशमी, अमृता खानविलकर, सुशांत दिवगीकर समवेत अनेक कलाकार दिसून येणार आहेत. ही वेबसीरिज सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article