कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडीतील कचरा उचलीकडे दुर्लक्ष

12:09 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : अधिवेशनानिमित्त महानगर पालिकेकडून शहर व उपनगरातील रस्त्यांची डागडुजी करण्यासह कचऱ्याची उचल करण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, न्यू शिवाजी कॉलनी, टिळकवाडी परिसरातील कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी मिनी कचरा डेपो निर्माण झाला असून याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

सुवर्णविधानसौधमध्ये 8 डिसेंबरपासून सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच महानगरपालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांची रंगरंगोटी, बंद पडलेले पथदीप सुरू करणे, तसेच ब्लॅकस्पॉट हटवून त्या ठिकाणी बाकडे व शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. विशेषकरून ज्या मार्गावरून मंत्रीमहोदय व अधिकारी ये-जा करतील त्या मार्गावरच अधिक प्रमाणात सुशोभिकरण करण्यात आले आहे. मात्र, अंतर्गत रस्त्यांवरील कचरा व्यवस्थितरीत्या उचल करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Advertisement

न्यू शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. भटकी कुत्री व मोकाट जनावरांचा वावरदेखील वाढला आहे. वारंवार मागणी करूनदेखील कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने स्थानिक नगरसेवकांनी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कचऱ्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article