महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरांतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष

11:11 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्त्यांची दुर्दशा; शहरवासियांचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास

Advertisement

बेळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहरात महत्त्वाच्या रहदारी रस्त्यांवर खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे शहरवासियांना खाच-खळग्यांच्या रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात आली असली तरी रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे हीच का स्मार्ट सिटी, असा प्रश्न शहरवासियांतून उपस्थित केला जात आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात आली असली तरी बाजारपेठेतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साचत आहे. अशा खड्डेमय रस्त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नरगुंदकर भावे चौकातील रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी साचत आहे.

Advertisement

खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना लागत नसल्याने जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीला कारण ठरत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याशेजारीच रस्त्यावरील व्यापाऱ्यांना व्यवहार करावा लागत आहे. तर खड्ड्यातील पाणी वाहनांच्या रहदारीमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्यामुळे वादाला कारण ठरत आहे. रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहरवासियांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. याकडे मनपा लक्ष देणार का?असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article