महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट-युजी’ परीक्षा पॅटर्न बदलणार

06:45 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जेईई-मेन’च्या धर्तीवर ऑनलाईन पद्धतीचा प्रस्ताव, सरकारने ‘एनएमसी’कडे पाठवला अहवाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

‘नीट-युजी’ परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो. सध्या ही परीक्षा ऑफलाईन पेन-पेपर पद्धतीने घेतली जाते. मात्र आता अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन परीक्षेच्या धर्तीवर ‘नीट’मध्ये बदल केले जाऊ शकतात.

नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) नवीन धर्तीवर परीक्षा घेण्याच्या अहवालावर निर्णय घेईल, असे केंद्र सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी 2018 मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा 2019 पासून वर्षातून दोनदा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल असे सांगितले होते. मात्र, आरोग्य मंत्रालयाने ऑनलाईन चाचणीला परवानगी दिली नाही. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित केल्याने दुर्गम आणि वंचित भागातील मुलांचे नुकसान होऊ शकते, असे मंत्रालयाने म्हटले होते.

‘नीट-युजी’ची नवीन तारीख दोन दिवसांत : शिक्षणमंत्री

‘नीट-युजी’च्या परीक्षेची नवीन तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. वास्तविक, 23 जून रोजी होणारी नीट-युजी परीक्षा एक दिवस आधी 22 जून रोजी रद्द करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social mediaeducatinal
Next Article