For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील 27 केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा सुरळीत

12:22 PM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
शहरातील 27 केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा सुरळीत
Advertisement

बेळगाव : मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ परीक्षा रविवारी बेळगावमध्ये सुरळीतरित्या पार पडली. शहरातील एकूण 27 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर कुठेही कॉपी अथवा इतर प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत स्कोअरिंग करणे आवश्यक असते. मागील वर्षभरापासून विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत होते. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 1.4 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. बेळगाव जिल्ह्यात केवळ शहरातील 27 केंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात आली.

Advertisement

परीक्षेदरम्यान लांब हाताचे शर्ट यासह फॅशनेबल कपड्यांना मनाई करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी साध्या ड्रेसकोडमध्ये परीक्षेला हजर होते. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी पालक हजर होते. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. दुपारी 2 ते 5 या वेळेत नीट परीक्षा घेण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाढीव एक तास वेळ देण्यात आला. नुकत्याच झालेल्या के-सीईटी परीक्षेदरम्यान कर्नाटकातील काही जिल्ह्यात परीक्षार्थींचे जानवे कापण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरात याचे पडसाद दिसून आले. असा प्रकार नीट परीक्षेदरम्यान घडू नये याची खबरदारी घेण्यात आली. पेन्सील बॉक्स, डिजिटल वॉच, प्लास्टिक पाऊच, पॅड, लॉग टेबल यासह इतर साहित्यावर मात्र बंदी घालण्यात आली होती. परीक्षा केंद्रात प्रवेश करतानाच असे साहित्य आढळल्यास ते काढून घेण्यात येत होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.