महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नीरज डायमंड लीग फायनलसाठी पात्र

06:21 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑलिम्पिक सुवर्णविजेता अर्शद नदीम अपात्र

Advertisement

वृत्तसंस्था/ .पॅरिस

Advertisement

भारतीय स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अर्शद नदीम मात्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकला नाही. डायमंड लीग क्रमवारीतील अव्वल 6 खेळाडू 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या स्थितीत नीरज 14 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. नीरज चोप्रासह अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबर, जेकब वॉडलेच, एड्रियन मार्डरे आणि रॉडरिक जेन्की डीन डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, यंदाच्या डायमंड लीग स्पर्धेच्या हंगामात नीरजने केवळ दोनच स्पर्धेत सहभाग घेतला होता. दोहा व लुसाने येथील स्पर्धेत त्याने 14 गुणाची कमाई केली व चौथ्या स्थानी राहिला. नीरजने याआधी 2022 मध्ये डायमंड लीग फायनल जिंकली आहे. गतवर्षी तो दुसऱ्या स्थानी राहिला होता. यंदा मात्र आता, अंतिम फेरीत मात्र त्याच्यासमोर अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरचे कडवे आव्हान असणार आहे. पीटर्स व वेबरची कामगिरी यंदाच्या हंगामात चांगली राहिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article