For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरज 7 वर्षात पहिल्यांदाच पदकविना

06:10 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
नीरज 7 वर्षात पहिल्यांदाच पदकविना
Advertisement

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आठवे स्थान : भारताचा सचिन यादव नीरज, नदीमवर पडला भारी : अवघ्या 40 सेंमीने हुकले पदक

Advertisement

वृत्तसंस्था/टोकियो

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राला रिकाम्या हाताने मायदेशी परतण्याची वेळ आली. नीरजची कामगिरी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फारशी चांगली राहिली नाही, त्याला आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. मात्र भारताचा दुसरा भालाफेकपटू सचिन यादवने सर्वोत्तम कामगिरी करताना चौथे स्थान पटकावले. दुसरीकडे, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने 88.16 मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकीसह सुवर्णपदक जिंकले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने (87.38 मीटर) रौप्यपदक तर अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने (86.67 मीटर) कांस्यपदकाला गवसणी घातली. टोकियो येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी सर्वाधिक लक्ष पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे होते. या अंतिम फेरीसाठी भारताचे नीरज चोप्रा आणि सचिन यादव हे दोघे पात्र ठरले होते. याशिवाय,

Advertisement

ऑलिम्पिक चॅम्पियन पाकिस्तानचा अर्शद नदीम, जर्मनीच्या ज्युलियन वेबरचाही समावेश होता. यामुळे अंतिम फेरी चुरशीची होणार हे निश्चित होते. बुधवारी अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर गुरुवारी मात्र नीरज लयीत नसल्याचे दिसून आले. नीरजचा पहिला थ्रो 83.65 मीटर होता. त्याचा दुसरा थ्रो 84.03 आणि त्याचा तिसरा थ्रो फाऊल होता. यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने 82.86 मीटर थ्रो फेकला. अशा प्रकारे, चार फेऱ्यानंतर त्याचा सर्वोत्तम स्कोअर 84.03 मीटर होता. त्याचा पाचवा प्रयत्न फाऊल होता, ज्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. यामुळे नीरज चोप्राला टॉप 6 मध्ये स्थान मिळविता आले नाही.

भारताचा सचिन मात्र चमकला

भारताचा दुसरा भालाफेकपटू सचिन यादवने 86.27 मीटर भालाफेक करत नीरजला मागे टाकले. त्याने नीरज आणि अर्शद नदीमसारख्या दिग्गजांना मागे टाकत आपल्या नावाचा डंका वाजवला. सचिन यादव कमालीच्या थ्रोसह चौथ्या क्रमांकावर राहिला. सचिनने पहिला थ्रो 86.27 मीटर केला. त्याचा दुसरा थ्रो फाऊल झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 85.71 मीटर थ्रो केला तर चौथा थ्रो 84.90 मीटरचा होता. त्याने पाचव्या प्रयत्नात 85.96 आणि सहाव्या प्रयत्नात 80.95 फेक केली. अशाप्रकारे, तो 86.27 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह चौथ्या स्थानावर राहिला. दुसरीकडे, त्रिनिदादच्या केशोर्न वॉलकॉटने 88.16 मीटर भाला फेकत सुवर्णपदकावर कब्जा केला. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने 87.38 मीटर थ्रोसह रौप्य तर अमेरिकेच्या कर्टीस थॉम्पसनने 86.67 मीटर थ्रोसह कांस्यपदक पटकावले. दुसरीकडे, पाकच्या अर्शद नदीमचीही खराब कामगिरी झाली. त्याला दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

जागतिक स्पर्धेत पहिल्यांदाच नीरजला पदक नाही

नीरज हा गतविजेता आहे. त्याने हंगेरी येथे झालेल्या 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर फेक करीत सुवर्णपदक जिंकले होते. यामुळे यंदाही त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती, पण त्याला पदकाविना मायदेशी परतावे लागले. 2017 साली नीरजने पहिल्यांदा आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवले होते. यानंतर त्याने विविध जागतिक स्पर्धामध्ये सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य जिंकण्याची कामगिरी केली आहे. पण, यंदा प्रथमच नीरजला जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयश आले.

Advertisement
Tags :

.