महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नीरज चोप्राकडून माघारीबद्दल खुलासा

10:04 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली/

Advertisement

भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन अॅथलिट नीरज चोप्राने 28 मे रोजी झेक प्रजासत्ताक येथे होणाऱ्या ओस्ट्रेवा गोल्डन स्पाईक स्पर्धेतून माघार घेतली असून त्याने या समस्येबाबत खुलासा केला आहे. या स्पर्धेतून आपण दुखापतीमुळे माघार घेतलेली नसून केवळ किरकोळ स्नायू दुखापतीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. अलीकडेच सराव सत्रामध्ये नीरजला स्नायू दुखापतीची किरकोळ समस्या जाणवली. त्यामुळे ही समस्या गंभीर होऊ नये यासाठी त्याने खबरदारी म्हणून ओस्ट्रेवा स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरविले. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने या स्पर्धेत सुवर्णपदक पुन्हा स्वत:कडे राखण्यासाठी आपले लक्ष राहिल असेही नीरजने सांगितले. मात्र ओस्ट्रेवा स्पर्धेत टोकियो स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तसेच 2023 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील कास्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा जेकूब वॅडेलेज तसेच ग्रेनेडाचा माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स हे सहभागी होणार असून नीरज चोप्रा केवळ प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे. डोहा येथे 10 मे रोजी झालेल्या डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्यपदक मिळवले होते तर त्यानंतर 15 मे रोजी झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article