महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नीरज चोप्रा ऑलिम्पिक फायनलमध्ये

06:58 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 पहिलाच थ्रो 89.34 मीटरचा : सीझनमधील सर्वोत्तम कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा नीरज चोप्रा यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी भालाफेकीच्या पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकून फायनलचे तिकीट मिळवले. थेट फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी 84 मीटर लांब भाला फेकणे गरजेचे होते. नीरजने पहिल्याच प्रयत्नात अगदी सहजरित्या ही कामगिरी केली. आता, सलग दुसऱ्यांदा नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालतो का, याची तमाम भारतीयांना उत्सुकता लागली आहे. भालाफेकची अंतिम फेरी दि. 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. याशिवाय, नीरजसह पाकिस्तानच्या अर्शद नदीम, जर्मनीचा ज्युलियन वेबर, झेक प्रजासत्ताकचा याकूब वेल्डरेच, गेनेडाचा पीटर्स अँडरसन यांनीही फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

मंगळवारी ब गटातील पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकला आणि फायनलचे तिकीट मिळवले. याशिवाय तो आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोच्याही जवळ आला. विशेष म्हणजे, या मोसमात नीरजचा सर्वोत्तम थ्रो 88.36 मीटर होता, जो त्याने दोहा डायमंड लीग 2024 मध्ये केला होता. आता, ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत 89.34 मीटर भालाफेक करत त्याने यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. आता नीरज अंतिम फेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे. नीरज

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article