नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धा स्थगित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नीरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धा 24 मे रोजी बेंगळूरमध्ये घेण्यात येणार होती. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आर्ल आहे.
सुरूवातीला ही स्पर्धो पंचकुलामध्ये होणार होती. पण या स्पर्धेच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशझोताची सोय नसल्याने आयोजकांनी स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला होता. बेंगळूरच्या शौकिनांना देशात पहिल्यांदाच होणारी नीरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धा म्हणजे पर्वणीच ठरणार होते. पण तणावग्रस्त स्थितीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.
या स्पर्धेमध्ये ग्रेनेडाचा जागतिक दर्जाचा भालाफेकपटू दोनवेळा विश्व विजेतेपद मिळविणारा अॅन्डर्सन पीटर्स, 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोलेर यांचा समावेश होता आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा पाकचा भालाफेकपटू अर्षद नदीमला या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्याने भारत व पाकिस्तान यांच्यील संघर्षामुळे माघार घेतली.