शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज
सांगरुळ :
महायुती सरकारने देशात आणि राज्यात विविध प्रकारच्या जनकल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत . लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या योजना जनतेच्या घरापर्यंत पोहोचवल्यास याचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब गरजू जनतेला मिळतो .सुशांत नाळे व शाहू तालीम मंडळाने शासनाच्या या योजना घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .त्यांच्या या सामाजिक कार्याला नेहमी पाठबळ देणार अशी ग्वाही करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली .
येथील छत्रपती शाहू (नाळे) तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित राजर्ष शाहू पुरस्कार वितरण व सुमारे साडेतीनशे पेन्शन लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .अध्यक्षस्थानी खंडोबा सहकार समूहाचे संस्थापक भगवानराव लोंढे होते .
यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसून त्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा लाभ होईल यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले .शाहू पुरस्कार देऊन परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम ही कौतुकास्पद असे गौरव उदगार आमदार नरके आणि यावेळी काढले .
गोकुळचे संचालक अजित नरके यांनी श्रावण बाळ पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचे उत्पादन मर्यादा वाढवावी यासाठी आमदारांनी विधिमंडळात प्रयत्न करावा अशी आवाहन केले .अध्यक्ष स्थानावरून बोलताना भगवानराव लोंढे यांनी सुशांत नाळे व शाहू नाळे तालीम मंडळाने कुस्ती मैदान व विविध सामाजिक उपक्रम परिसरात राबवून आदर्श निर्माण केल्याचे सांगितले .
सुरुवातीस संयोजक पै.सुशांत नाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले . प्रास्ताविक संतोष वातकर यांनी केले .यानंतर पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आले .गावातील विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला .
यावेळी वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अनिल साेलापूरे, विद्यामंदीर पात्रेवाडी (ता. राधानगरी)चे मुख्याध्यापक आनंदराव नाळे, कृषी क्षेत्रात तानाजी मोरे (कोगे), उद्योग क्षेत्रात नितीन जंगम (जंगम कृषी उद्योग), वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सर्जेराव चाबूक (सांगरुळ) , उत्कृष्य शासकीय अधिकारी म्हणून सरदार दिंडे (बहिरेश्वर) , उत्कृष्ट सरपंच म्हणून तेजस्विनी तडूलकर (चिंचवडे), उत्कृष्ट दूध उत्पादक म्हणून मारुती खाडे (सांगरुळ), पत्रकार कुंडलिक पाटील उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून सिंधुताई नाळे तर सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल शिवाजी सिताराम पाटील सहकार समुह आमशी यांना आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते गौरवण्यात गौरवण्यात आले
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष राहुल खाडे, माजी उपाध्यक्ष निवास वातकर सदाशिव खाडे प्रदीप नाळे जनार्दन खाडे राजाराम खाडे प्रा एस पी चौगले संजय पाटील विलास पाटील यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते .आभार पत्रकार विलास नाळे यांनी मानले .