गळाभेटीचेशुल्क हवे
विवाह मोडल्यावर महिलेची अजब मागणी
चीनमध्ये एका हैराण करणारी घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हेनान प्रांतातील एका महिलेने स्वत:च्या नियोजित वरासोबतचा विवाह मोडल्यावर त्याच्याकडून गळाभेटीचे शुल्क मागितले आहे. या अजब मागणीमुळे लोक अचंबित झाले आहेत आणि आता हे प्रकरण पूर्ण चीनमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या महिलेने स्वत:च्या भावी जोडीदारासोबतच्या साखरपुड्यादरम्यान 2 लाख युआनचे (सुमारे 28 हजार डॉलर्स) ‘मॅरेज गिफ्ट’ घेतले होते, परंतु विवाहाच्या काही आठवड्यांपूर्वी तिने हे नाते मोडले आणि आता मी विवाह करू शकत नसल्याचे सांगितले.
हगिंग फीची मागणी
विवाह रद्द झाल्यावर महिलेने गिफ्टच्या स्वरुपात प्राप्त 1 लाख 70 हजार 500 युआन (सुमारे 24 हजार डॉलर्स) परत करेन, तर 30 हजार युआन स्वत:कडे बाळगेन, ही रक्कम हगिंग फी असल्याचे सांगितले आहे. प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान जोडप्याला गळाभेट घेण्यास सांगण्यात आल्यावर पुरुषाने महिलेला मिठी मारली होती आणि आता हाच गळाभेटीचा क्षण शुल्कात बदलला आहे.
पुरुष अत्यंत प्रामाणिक
त्यांच्या या नात्याची सुरुवात मागील वर्षी एका मध्यस्थाद्वारे झाली होती. दोघांचा विवाह नोव्हेंबरमध्ये होणार होता, हॉटेल बुक झाले होते आणि कार्डही छापण्यात आले होते, परंतु विवाहापूर्वी महिलेने नाते तोडत आता आपण त्याच्यासोबत विवाह करू इच्छित नसल्याचे जाहीर केले. युवक अत्यंत प्रामाणिक असून त्याचे उत्पन्न अत्यंत कमी असल्याचे युवतीचे म्हणणे आहे. युवती आता हुंड्याची रक्कम परत करणार आहे, परंतु 30 हजार युआन गळाभेटीचे शुल्क म्हणून ठेवून घेणार आहे.
ब्राइड प्राइसची परंपरा
हे प्रकरण चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाले असून आतापर्यंत याला 2.3 कोटीहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. 10 वर्षांमध्ये मी 1 हजार जोडप्यांचा विवाह करविला आहे, परंतु इतका अजब परिवार कधी पाहिला नाही. ही मागणी नैतिक स्वरुपात चुकीची असल्याचे मध्यस्थाचे सांगणे आहे. चीनमध्ये साखरपुड्यावेळी ‘ब्राइड प्राइस’ म्हणचेच वराच्या परिवाराकडून वधूच्या परिवाराला रक्कम देण्याची परंपरा आहे. परंतु अनेकदा विवाह मोडल्यावर महिला ही रक्कम परत करण्यास नकार देतात. अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने हुंडा परत करण्याशी निगडित प्रकरणांवर दिशानिर्देशही जारी केले आहेत.