सोशल मीडियापासून ब्रेक आवश्यक
सातत्याने नकारात्मक वृत्त पाहण्याचे दुष्परिणाम
मध्यरात्री कुठलाही विचार न करता नकारात्मक वृत्तं वाचत सोशल मीडियावर स्क्रॉलिंग करण्याचा प्रकार वाढला आहे. अशाप्रकारच्या सवयी संबंधिताला धक्का पोहोचवितात, हातापायाला घाम फुटतो, तरीही संबंधित त्यावरून नजर हटवू शकत नाही. विज्ञानाच्या भाषेत या समस्येला ‘डूमस्क्रॉलिंग’ म्हटले जाते. अमेरिका आणि इराणच्या 800 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर झालेल्या नव्या अध्ययनात सोशल मीडियावर त्रासदायक वृत्तांना अधिक स्क्रॉल करणे लोकांना दु:खी, चिंतित आणि क्रोधित करत असल्याचे आढळून आले आहे.
सातत्याने नकारात्मक वृत्तांच्या संपर्कात राहणे मनोवैज्ञानिक स्वरुपात प्रभावित करू शकते, भले मग तुम्ही घटनेशी थेट जोडलेले नसले तरीही हे घडू शकते असे अध्ययनाचे लेखक आणि फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीचे मनोवेज्ञानिक रेजा शबांग यांनी म्हटले आहे.
पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरसारखी लक्षणे
दु:खद घटनेशी निगडित छायाचित्रे आणि माहिती मिळाल्याने लोकांमध्ये चिंता आणि निराशेसारखी पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरसारखी लक्षणे दिसून आली आहेत. सातत्याने ऑनलाइन नकारात्मक बातम्या आणि माहितींशी जोडलेले राहिल्यास आपल्याला स्वत:च्या जीवनात धोका जाणवू लागतो. यामुळे जग आणि आसपासच्या लोकांविषयी दृष्टीकोन अधिक नकारात्मक होऊ शकते. तसेच विश्वास घटू लागतो, सर्वांना संशयाच्या नजरेने पाहण्याचा प्रकार वाढतो. डूमस्क्रॉलिंगमुळे असित्वाच्या धोक्यावरून हे पहिले अध्ययन असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अध्ययनाचे निष्कर्ष कॉम्प्युटर इन ह्यूमन बिहेवियर रिपोर्ट्स नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत.
डूमस्क्रॉलिंगचा मानसिक आरोग्यावरील प्रभाव हा लोक सातत्याने तुमच्यावर ओरडत असलेल्या खोलीत राहण्यासमान आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या वृत्तांना किमी महत्त्व द्यावे हे युजर्सनी समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे झोपण्यापूर्वी आणि जागे झाल्यावर सोशल मीडिया पाहण्यात काही अंतर ठेवणे उत्तम ठरेल असे वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीतील डिजिटल बिहेवियर तज्ञ डॉ. जोआन ऑरलँडो यांनी सांगितले.
सोशल मीडियावरून नियमित स्वरुपात ब्रेक घेतला जाणे आवश्यक आहे. अनेकदा कंटाळा घालविण्यासाठी लोक डूमस्क्रॉलिंग करतात, त्याऐवजी एखादा नवा छंद जोपासावा, जेणेकरून कंटाळून पुनहा सोशल मीडियाकडे संबंधित वळू नये अी सूचना न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटीमधील मानसिक आरोग्य तज्ञ हेलेन क्रिस्टेंसन यांनी केली आहे. नकारात्मकऐवजी सकारात्मक वृत्त अधिक वाचण्याचे लक्ष्य ठरविले जावे. फोन चेक करण्यासाठी अलर्ट रहावे, परंतु त्याचे वेड लागू नये. स्क्रॉलिंगचा कालावधी कमी केला जावा, सोशल मीडियावरील वेळ कमी केल्याने संबंधित व्यक्ती वर्तमान जीवनात उपस्थित राहणे शिकू शकतो. या उपायांनीही सुधारणा न झाल्यास डॉक्टरांची मदत घेणे टाळू नये असे हेलेन यांनी सांगितले आहे.