आक्षेपार्ह काही नव्हते तर २० लाख का दिले ? राष्ट्रवादीच्या महिला नेत्या शितल फऱाकटे यांचा निवेदिता घाटगे यांना सवाल
बोगस कस्टम व सीबीआय अधिकाऱ्यांनी शहरातील नवोदिता समरजीत घाटगे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांना 20 लाखांला गंडा घातला. या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील या फसवणूक प्रकरणातील संशयीताचा शोध घेण्यास शाहुपूरी पोलिसांना यश आले नाही. तसेच या प्रकरणामध्ये मलेशिया आणि अमली पदार्थाचा उल्लेख करण्यात आल्याने, या प्रकरणाचा तपास एनआयए आणि एनसीबी या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=huO2N-mlEjU[/embedyt]
फराकटे म्हणाल्या, नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला एक पार्सल पाठविले होते. 2 जुन रोजी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने कस्टम अधिकारी असल्याचे सांगत, तुम्ही मलेशियात पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड आहे. हा गंभीर गुन्हा असून, तुमच्याविरोधात कायदेशिर कारवाई केली जाईल, अशी भिती घातली. त्यानंतर पुन्हा त्यांना दुसऱ्या नंबरवऊन फोन आले. त्यांनी आपण सीबीआयमधील गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून, तुम्ही केलेला गुन्हा गंभीर असून, तो दाखल करायचा नसेल. तर पैसे द्यावे लागतील. असे सांगून, 20 लाख ऊपये ऑनलाईन पध्दतीने उकळून गंडा घातला. याबाबत शाहुपूरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने शाहुपूरी पोलिसांनी तपास सुऊ केला आहे. गुन्हा दाखल होवून पंधरा दिवसाचा कालावधी लोटला. तरीदेखील पोलिसांना या गुह्यातील संशयीताच्या मुसक्या आवळण्यास यश आलेले नाही.
तसेच संशयीताच्या ज्या बँक खात्यावर 20 लाखांची रक्कम वर्ग केलेली आहे. त्या बँक खात्यांचा अद्याप शोध का लागलेला नाही. परदेशात पाठवलेल्या त्या पार्सलचे पुढे काय झाले ? ते ज्या ठिकाणी पाठवायचे होते तिथे पोहचले की नाही ? त्या पार्सलमध्ये जर काही आक्षेपार्ह आणि बेकायदेशिर नसेल, तर मग ते मिटविण्यासाठी 20 लाख ऊपये द्यायची गरज काय होती ? यांचा खुलासा झालाच पाहिजे, अशी मागणी जिल्हाध्यक्षा फराकटे यांनी केली.
या पत्रकार बैठकीला राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित पवार गट) शहराध्यक्षा रेखा आवळे, शहर उपाध्यक्षा लता मोरे, युवती अध्यक्षा पुजा साळोखे, श्वेता बडोदेकर, संध्या भोसले, अलका वाघेला, सुनिता राऊत, अलिना मुजावर, पद्मजा भालकर, शाहिन अत्तार, माधवी मोरबाळे आदी उपस्थित होते.
राज्याचे गृह मंत्र्याना घरचा आहेर
नवोदिता घाटगे यांच्या फसवणूक प्रकरणातील संशयीतांचा शोध अद्यापी लागलेला नाही. याबाबत बोलविलेल्या पत्रकार बैठकीत राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी नवोदिता घाटगे यांची फसवणूक करणाऱ्या संशयीतांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आल्याने, राज्याचा गृह विभागाबरोबर राज्याचे गृहमंत्री निक्रीय झाले आहे. असा राज्याचे गृह मंत्री देवेद्र फडणवीस यांचे नाव न घेता जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी राज्य सरकाराला घरचा आहेत दिला. त्याचबरोबर या फसवणूक प्रकरणातील संशयीताचा येत्या आठ दिवसात शोध न लागल्यास, तिव्र आंदोलन करणार असल्याची माहिती फराकटे यांनी पत्रकार बैठकीत दिली.