NCP Board : पालिकेवर झळकला राष्ट्रवादीचा फलक, आंदोलनाच कारण नेमकं काय?
पालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाचा नाम फलक पालिका इमारतीवर लावला.
आष्टा : आष्टा शहरातील शासकीय विकास कामांचे श्रेय घेऊन तत्कालिन भाजपा आणि सध्याच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदेशीर लावलेले बोर्ड काढण्याची मागणी करुनही बोर्ड न काढल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आष्टा पालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय आष्टा (शरदचंद्र पवार गट) असा बोर्ड लावला.
यामुळे पालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाचा नाम फलक पालिका इमारतीवर लावला. आष्टा पालिका प्रशासनाचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी हे अनोखे आंदोलन केले. आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, प्रवीण बारे, सोमनाथ डोंबाळे, राजू माने, सयाजी गावडे, प्रकाश सिद्ध, सुनील माने, सतीश माळी, चैतन्य ढोले, प्रकाश रुकडे, अनिल पाटील, बाबासो सिद्ध, प्रभाकर जाधव, दिलीप कुरणे, गुंडाभाऊ मस्के, राजकेदार आटुगडे, पंकज माळी, महेश पाटील, शशिकांत भानुसे, कपिल कदम, राजू गावडे, भीमराव माने, दिपक ढोले, उदय मोटकट्टे उपस्थित होते.
आष्टा नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयाचा फलक लावला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पालिका प्रशासनाचा तसेच कर्मचारी व अधिकारी यांचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालिकेचे अधिकारी मोहिते यांच्याशी चर्चा केली.
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्यांनी लावलेले अधिकृत फलक काढावेत, अशी मागणी केली. शिवाजीराव चोरमुले म्हणाले, आष्टा शहरातील शासनाच्या विकास कामाबाबत तत्कालीन भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आष्टा शहरात कायमस्वरूपी बोर्ड लावून जनतेची दिशाभूल करुन जाहिरात केली आहे. तरी आपण संबंधित पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.
आष्टा शहराचा विकास हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेला आहे. कोणी एकाच्या खिशातील पैसे किंवा तो स्व-निधीमधून विकास झालेला नाही. आष्टा गावच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या पदाधिकारी यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी प्रांताधिकारी आणि पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र पालिका प्रशासनाने कसलीही पाऊले उचललेली नाहीत.
याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आज पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचा बोर्ड लावला आहे. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात हे पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांनी विसरू नये. आमचेही दिवस येतील. त्यावेळी यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला.
यावेळी संदीप खोत, गोटू थोटे, उदय मोरे, उदय मोतकट्टे, शाहनवाज मुजावर, भैय्या माने, निलेश बरणे, अभिजीत तानगे, नितीन भोसले, राहुल बारे, विश्राम बारे, सत्यजित पाटील, विकास कडोळकर, महेश पाटील, सचिन लोंढे, शुभम चव्हाण, संग्राम बारे, प्रेम वारे, सिद्धार्थ हाबळे, अर्जुन मस्के, मयूर बोरकर, अभिजीत गोरे, श्रीजीत गायकवाड, आकाश जाधव, रोहन मुल्ला, सुशांत शेळके, स्वरूप हजारे, अविनाश शेळके, सत्यजित पाटील, आकाश कोरे, सौरभ खोत, दिनकर ढोले, सलीम अत्तर, शुभम माळी, टिपू अत्तार, उषा विरभक्त, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
इतिहासात प्रथमच पालिकेवर पक्षाचा नामफलक
आष्टा पालिकेवर अनेकवेळा वेगवेगळी आंदोलने झाली आहेत. कोणी पालिकेत साप सोडण्याची धमकी दिली होती तर काहीजणांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर चपला ठेवून आंदोलन केले होते. काहींनी बोंबाबोंब आंदोलनही केले होते. जयंतराव पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारच्या आंदोलनांना फाटा देत चक्क पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फलक लावून संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाची चर्चा मंगळवारी जिल्हाभर सुरू होती.