शरद पवारांचं ठरलं...नवा पक्ष...नवं चिन्हं! शरद पवारांच्या गटाला मिळणार हे नाव
ज्येष्ठ राजकिय नेते शरद पवार यांनी आपल्या गटासाठी निवडणुक आयोगासमोर तीन नावांची यादी सादर केली. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नावावर शिक्कामोर्तब झाले. 1999 साली स्वता स्थापन केलेल्या पक्षाची पक्षावरील अधिकार निवडणुक आयोगाच्या निकालानंतर त्यांनी आज हा निर्णय घेतला. निवडणुक आयोगाने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचाच खरा पक्ष असल्याचा निर्वाळा देऊन पक्षाचे चिन्हही त्यांच्या पदरात टाकले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद राव पवार अशी तीन नावे शरद पवार गटाने निवडणुक आयोगाला सुचवली होती. त्यावर निवडणुक आयोगाना शरदचंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या नावाबरोबरच शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर पक्ष आपल्या पक्षाला ओळख मिऴवण्यासाठी काही चिन्हे देखील सुचवली आहेत. त्यापैकी उगवता सूर्य आणि वटवृक्ष ही दोन चिन्हे चर्चेत आहेत. त्यापैकी वटवृक्ष हे नाव मिळवण्यावर शरद पवार गट आग्रही आहे.