Sangli Politics : राष्ट्रवादी काँग्रेस श. प पक्षाची प्रचारात आघाडी ; ईश्वरपूरमध्ये कोपरा सभांचा धडाका
03:53 PM Nov 28, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
ईश्वरपूरमध्ये विकास आराखड्यावर आधारित लोकविश्वास निर्माण
Advertisement
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस श. प पक्षाने आघाडी घेतली असून कोपरा सभा, रॅली, मतदारभेटी भर दिला आहे. त्याचबरोबर वासुदेवांमार्फत होणारा प्रचार लक्ष वेधून घेत आहे.
प्रचारात पक्षाने दिलेली दशसूत्री केंद्रबिंदू ठरला आहे. नागरिकांच्या अडचणींचा अभ्यास आणि त्याबर आधारित विकास आराखडा असल्याने ही दशसूत्री लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.
Advertisement
या दशसुत्रीत मूलभूत सुविधा, स्वच्छ व हरित शहर, महिला व युबक सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, स्थानिक रोजगार, पारदर्शी प्रशासन, सर्वसमावेशक विकास, कृषी पूरक निर्णय यांचा समावेश आहे.
Advertisement