For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : स्थानिक स्वराज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे ; ना. मकरंद पाटील यांचे आवाहन

03:27 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
satara   स्थानिक स्वराज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे   ना  मकरंद पाटील यांचे आवाहन
Advertisement

               सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाकांक्षी बैठक

Advertisement

सातारा : येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन कामाला सुरुवात करावी. ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची असून जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम सुरू करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल लेक व्हिव येथे मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  यावेळी आमदार सचिन पाटील, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, उदयसिंह पाटील,  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, संजय देसाई, शिवरुपराजे खर्डेकर, प्रतापराव पवार, किसनशेठ शिंदे, सीमा जाधव, नितीन भरगुडे पाटील, प्रमोद शिंदे, मनोज देशमुख,शिवाजीराव महाडिक, मनोज पोळ, उदय कबुले, सुरेंद्र गुदगे,  दत्ता नाना ढमाळ, विक्रमबाबा पाटणकर, प्रदीप विधाते, नितीन भिलारे, किरण साबळे पाटील,अर्जुन खाडे,पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

प्रारंभी सर्व तालुकाध्यक्ष यांनी आपल्या कामाचा अहवाल देताना निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले. मंत्री ना. मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असून आता आपण पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अनेक अनुभवी नेत्यांना आपल्या सोबत घेत आहोत. आगामी काळात आणखी काही लोक आपल्या सोबत येणार आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता सर्वांनी एकजुटीने कामाला सुरुवात करायला हवी जेणेकरून पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यास मदत होईल ज्या तालुक्यात अद्याप आपले पदाधिकारी सक्रिय झाले नाहीत त्यांनी तातडीने सक्रिय व्हावे व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाचे ध्येयधोरणे व घेतलेले महत्वपूर्ण निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावे.

प्रास्ताविकात बाळासाहेब सोळसकर यांनी पक्षाची वाटचाल आणि जिल्ह्यात सुरू असलेली पक्ष प्रवेश आणि संघटना बांधणीचा आढावा घेताना सर्वांनी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. संजय देसाई यांनी सर्वांचे स्वागत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त यश मिळण्यासाठी सर्वांनी सक्रिय होण्याची सूचना केली.

श्रीनिवास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानले. यावेळी किसनशेठ भिलारे, प्रवीण भिलारे, महादेव मस्कर ,सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी, प्रतिभा शिंदे, सुनील शिंदे, नासीर  मुलाणी, विजयसिंह यादव, पृथ्वीराज गोडसे, राजेंद्र तांबे, आदी उपस्थितीत होते.

Advertisement
Tags :

.