राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात ५ विधानसभा लढणार! शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के.पोवार
शहर कार्यकारिणीची बैठक
कोल्हापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पारंपारिक चंदगड, राधानगरी-भुदरगड व कागल या तीन मतदार संघांपैकी कोल्हापूर उत्तर अथवा कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी अशाप्रकारे जिह्यातून पाच ते सहा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले.
पक्षातर्फे ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र‘ या मोहिमेत सहभागी होऊन ऑनलाइन लिंकद्वारे आपले मत नोंदवण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या माहितीसाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती. बैठकीला सरचिटणीस सुनिल देसाई, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, रामराजे कुपेकर, निरंजन कदम, रावसाहेब भिलवडे, शिवानंद माळी, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, गणेश जाधव, आप्पा हजारे, मकरंद जोंधळे, मुसाभाई कुलकर्णी आदी उपस्थित होते.