नवचर्चित अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या, नायगाव स्टुडियोत घेतला गळफास
tunishasharmasuside- टेलिव्हिजन तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावांपैकी एक असलेल्या तुनिषा शर्मा आज आत्महत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिशाहिने नायगाव येथील स्टुडियो मध्ये आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सेटवर तणावात दिसत होती. अली बाबा: दास्तान-ए-काबुलचा मुख्य अभिनेता असलेल्या शीझान खानच्या मेकअप रूममध्ये तिने गळफास लावून आत्महत्या केली.
२० वर्षीय अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या कार्यक्रमातून केली. चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पुंचवाला, शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग, इंटरनेट वाला लव, इश्क यांसारख्या शोमध्ये काम केले. सुभान अल्लाह आणि अली बाबा: दास्तान-ए-काबुल यात देखील तिने काम केले आहे.
अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये ती शेवटची दिसली होती. ज्यामध्ये तिने शहजादी मरियमची भूमिका केली होती. तुनिषा शर्मा फितूर, बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंग, आणि दबंग 3 यांसारख्या चित्रपटांचा देखील भाग होती. फितूर आणि बार बार देखो या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने तरुण कतरिना कैफची भूमिका केली होती. कहानी 2: दुर्गामध्ये राणी सिंह, ती विद्या बालनच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. या अभिनेत्रीने सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर दबंग 3 मध्ये कॅमिओ देखील केला होता.