न्यायाधीशाच्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन
उपेंद्रनाथ राजखोवा यांच्या आयुष्यावर चित्रपट
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्वत:च्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. एका बायोपिक चित्रपटात नवाजुद्दीन हा न्यायाधीश उपेंद्रनाथ राजखोवा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. उपेंद्रनाथ राजखोवा हे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त राहिले आहे. धुबरीचे माजी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजखोवा हे स्वत:च्या परिवाराच्या सदस्यांच्या क्रूर हत्येनंतर चर्चेत आले होते. या घटनेने पूर्ण आसाम राज्य हादरून गेले होते. या चित्रपटाची निमिर्ती नवाजुद्दीन यांचे बंधू फैजुद्दीन सिद्दीकी करणार आहेत. राजखोवा यांना झालेली अटक आणि त्यानंतर ठोठावण्यात आलेला मृत्युदंड यावर हा चित्रपट आधारित असणार आहे. अभिनेत्याने या संवेदनशील विषयावर काम करण्यापूर्वी संबंधितांकडून सहमती मिळविली आहे. नवाजुद्दीन आगामी काळात आर्टिकल 108, बोले चूडियां, नूरानी चेहरा, फ्राइट फ्लाइट यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यापूर्वी रौतू का राज हा त्याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.