For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रौतू का राज’मध्ये नवाजुद्दीन

06:13 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रौतू का राज’मध्ये नवाजुद्दीन
Advertisement

झी5 वर होणार प्रदर्शित

Advertisement

नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट ‘रौतू का राज’ लवकरच झी5 आणि ओटीटी प्ले प्रीमियमवर प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच जारी करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता याचा धमाकेदार ट्रेलर जारी करण्यात आला आहे. ट्रेलरच्या माध्यमातून याच्या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यात आली आहे. नवाजुद्दीन एका आळशी गावात एक स्मार्ट पोलिसाची भूमिका साकारत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

नवाजुद्दीन यात इन्स्पेक्टर दीपक नेगी नावाची भूमिका साकारत आहे. तर राजेश कुमार या भूमिकेत नरेश डिमरी दिसून येणार आहे. उत्तराखंडच्या मसूरी येथे असलेल्या रौतू या हिल स्टेशनवर झालेल्या हत्येच्या रहस्याची उकल करण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर दीपक नेगीला देण्यात आलेली असते.

Advertisement

आनंद सुरपूर यांच्याकडून दिग्दर्शित रौतू का राज या चित्रपटात तनुज मेहरा या भूमिकेत अतुल तिवारी तर वार्डन संगीत या भूमिकेत नारायणी शास्त्राr दिसून येणार आहे. हा चित्रपट 28 जून रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.