महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानात नवाज-बिलावल आघाडीचे सरकार

06:28 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही पक्षांमध्ये सहमती : शाहबाज पंतप्रधान, आसिफ अली झरदारी राष्ट्रपती

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानात सरकार स्थापन करण्यासाठी नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पीपीपीमध्ये सहमती झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही पक्षांदरम्यान आघाडीसंबंधीच्या अटींवर एकमत झाले आहे. शाहबाज शरीफ हे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, आसिफ अली झरदारी हे  राष्ट्रपती पद सांभाळतील अशी माहिती बिलावल यांनी दिली आहे.

इम्रान खना यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) समर्थनप्राप्त खासदार आणि सुन्नी इत्तेहाद कौन्सिल यांच्या आघाडीला पुरेसे संख्याबळ मिळविता आले नाही. तर दुसरीकडे पीपीपी आणि पीएमएल-एन यांच्या आघाडीकडे बहुमत असल्याने त्यांचे सरकार स्थापन होणार आहे.

पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली होती, परंतु कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत (134 जागा) मिळू शकले नव्हते. यामुळे निकालाच्या 12 दिवसांनंतरही पाकिस्तानात अद्याप कुणाचेच सरकार सत्तेवर आलेले नाही. पाकिस्तानातील सैन्यनेतृत्व यावेळी नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या बाजूने झुकलेले असल्याचे चित्र आहे. याचमुळे सैन्याने बिलावल यांना शरीफ यांच्या पक्षासोबत आघाडी करण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे.

इम्रान खान यांचा वरचष्मा

इम्रान खान यांचे समर्थक असलेले अपक्ष सर्वाधिक 93 जागांवर विजयी झाले आहेत. यामुळे इम्रान खान समर्थकांनी पाकिस्तानातील धार्मिक पक्ष सुन्नी इत्तेहाद कौन्सिलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या पक्षाने निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय मिळविला होता. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये 70 जागा राखीव असतात, या जागा केवळ राजकीय पक्षांनाच प्रदान करण्यात येतात, यामुळे स्वत:च्या राखीव जागा वाचविण्यासाठी सुन्नी इत्तेहाद कौन्सिलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पीटीआयचे अध्यक्ष गौहर खान यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article