महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नौदलाच्या ‘मिलन-24’ लष्करी सरावाला प्रारंभ

06:05 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

51 देशांच्या 35 युद्धनौका विशाखापट्टणममध्ये : आयएनएस विक्रांत आणि विक्रमादित्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

Advertisement

भारतीय नौदल ‘मिलन-24’ अंतर्गत तब्बल 50 देशांसोबत सराव करणार आहे. 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान हा सराव होणार असून सोमवारी त्याला थाटात प्रारंभ करण्यात आला. या नौदल सरावात 18 युद्धनौका आणि विमानांचा ताफा समुद्र आणि बंदरावर लष्करी सराव करणार आहे. ही नौदल सहकार्यातील एका नव्या युगाची सुऊवात असून देशाच्या नौदल हिताच्या सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आल्याचे दिसून येत आहे. या सरावासाठी विविध देशांच्या 30 ते 35 मोठ्या युद्धनौका विशाखापट्टणमला पोहोचल्या आहेत.

आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नौदल मेळाव्यासाठी 58 देशांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यापैकी 50 देशांनी सहभाग घेतला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या नऊ दिवसांच्या ‘मिलन-24’ सरावाच्या 12व्या आवृत्तीत सागरी क्षेत्रातील सुरक्षितता आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरील रणनीती व्यावहारिकदृष्ट्या कडक ठेवण्याची चाचणी केली जाईल. या सरावात सहभागी झालेले देश या प्रदेशातील गुंतागुंत सोडविण्यासाठी एकजुटीने मार्गक्रमण करतील. विविध देशांच्या विकास, व्यापार आणि समृद्धीसाठी या प्रदेशातील प्रत्येक प्रकारची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

भारतीय नौदल वचनबद्ध

सोमालियातील समुद्री चाच्यांपासून वाचवल्याबद्दल पाकिस्तानी आणि इराणी संघांनी भारतीय नौदलाचे आभार मानल्यानंतर नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी आता संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसात सोमालियातील चाच्यांनी वेगवेगळ्या देशांतील मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या होत्या. मोठ्या जहाजांना लुटण्यासाठी समुद्री चाचे या बोटींचा वापर करतात. त्यामुळे भारतीय नौदलाने या चाच्यांना शस्त्रांसह आत्मसमर्पण करण्यास भाग पाडून बोटीतील क्रू मेंबर्सना सोडण्यात आले होते.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article