महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेव्हीमध्ये नोकरीचे अमिष,13 लाखांचा गंडा

04:30 PM Dec 13, 2024 IST | Radhika Patil
Navy job scam, 13 lakhs embezzled
Advertisement

कवठेमहांकाळ : 

Advertisement

कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील सागर सुभाष मोहिते वय 23 वर्षे व त्याचे इतर 16 साथीदारांची इंडियन नेव्हीमध्ये नोकरीस लावण्याचे आमिषाने  13 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली. या घटनेची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Advertisement

खरशिंग येथील सागर सुभाष मोहिते व त्याच्या 16 साथीदारांना इंडियन नेव्हीमध्ये नोकरीस लावतो म्हणून राहुल कुमार रा. पोसवन, जिल्हा आरा, राज्य बिहार याने सुमारे 13 लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातला, पैसे घेऊनही नोकरी मिळाली नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला असता आरोपीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर बुधवार दि. 11 डिसेंबर रोजी सागर सुभाष मोहिते रा. खरशिंग याने आरोपी राहुल कुमार रा.पोसवन, जिल्हा आरा, राज्य बिहार याचे विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. अधिक तपास सपोनी विनायक मसाळे करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article