कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नौदल, डीआरडीओकडून ‘एमआयजीएम’ची चाचणी

06:11 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समुद्राखाली लपलेल्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

भारतीय नौदल आणि डीआरडीओ यांनी स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि विकसित केलेल्या मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची (एमआयजीएम) यशस्वी चाचणी केली. या चाचणीत सुरक्षिततेची मानके पाळत कमी स्फोटक पदार्थांचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

समुद्राखालील शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास ‘एमआयजीएम’ सक्षम आहे. ‘एमआयजीएम’ची निर्मिती भारतात पहिल्यांदाच पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. या चाचणीमुळे नौदलाची ताकद आणखी वाढली असून सागरी सुरक्षा मजबूत करण्यात मोलाची भर पडली आहे.

यापूर्वी, भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका आयएनएस सुरतने समुद्रात वेगाने उडणाऱ्या लक्ष्यावर अचूक हल्ला केला होता. या कामगिरीमुळे नौदल आणखी शक्तिशाली झाले आहे. हे यश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article