कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नौदलाकडून कोकणसाठी मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

04:11 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल विभागाकडून कोकण किनारपट्टीवर ऑफशोअर डिफेन्स एरिया अर्थात मासेमारी प्रतिबंध क्षेत्र ( No Fishing Zone ) घोषित करण्यात आले आहे. नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच क्षणी गोळ्dया घालण्याचे आदेश नौदल विभागास देण्यात आले आहेत.

Advertisement

नौदल विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रतिबंधित क्षेत्रासंबंधीचा निर्णय घेण्यात आल़ा कोणतीही मासेमारी नौका मासेमारीस वा अन्य कोणत्याही प्रयोजनास जाणार नाही तसेच नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत.

तरी या ठिकाणी आपले अधिनस्त कोणतीही मासेमारी नौका जाणार नाही, या बाबतची दक्षता सर्व नौका मालक व मच्छीमार यांनी घ्यावी. मच्छीमार नौकांच्या सर्वेक्षणासाठी नौदल विभागाकडून संस्थानिहाय नौकांची माहिती मागवण्यात आली असल्याने ही माहिती परवाना अधिकारी यांच्यामार्फत तत्काळ सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय या कार्यालयास सादर करावी, असे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त सा. वि. कुवेसकर यांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article