For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नॅवी बॉईजला सेंट सॅबेस्तियन चषक फुटबॉलचे जेतेपद

12:15 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
नॅवी बॉईजला सेंट सॅबेस्तियन चषक फुटबॉलचे जेतेपद
Advertisement

मडगाव : अंतिम लढतीत शिरवडे बॉईजचा 2-0 असा पराभव करून नॅवी बॉईजने मांडोप बॉईजने आयोजित केलेली सेंट सॅबेस्तियन कप फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचे आयोजन मांडोप फुटबॉल मैदानावर झाले. मायजॉईस फर्नांडिसने सामन्याच्या 17व्या व 31व्या मिनिटाला नॅवी बॉईजचे गोल केले. विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक रोख बक्षीसे व चषक देण्यात आले. सॅम परेराची स्पर्धेतील प्रतिभावंत फुटबॉलपटू, मायजॉईस फर्नांडिसची अंतिम सामन्यातील पहिला गोल, जॉयसन कुतिन्होची उत्कृष्ट डिफेंडर, मिकी फर्नांडिसची उत्कृष्ट गोलरक्षक तर रोहन रॉड्रिग्जची अंतिम सामन्यातील उत्कृष्ट मीडफिल्डर पुरस्कारासाठी निवड झाली. एडवीन कार्दोज यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी फादर लॅस्टर कार्दोज तसेच सिद्धेश भगत यांची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.