येळ्ळुरात नवरात्रोत्सव मंगलमय वातावरणात
वार्ताहर/येळळूर
येळ्ळूर येथे नवरात्रोसवाला उत्साहात व मंगलमय वातावरणात सुरूवात झाली. आकर्शक विद्युत रोषणाई व झेंडूंच्या फुलांच्या माळांची आकर्षक सजावटीने गावातील चांगळेश्वरी मंदिरासह कलमेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, गणपती मंदिर, परमेश्वर मंदिर, सिद्धेश्वर, दत्त मंदिर, जोतिबा मंदिर सजलेली आहेत. घरोघरी घटांची पारंपारिक पद्धतीने स्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरवात केली आहे. या निमित्याने मंदिरातून भजन, किर्तनासह जागर सुरू आहे. आरती आणि देवीला आरोग्य सुख आणि रक्षणासाठी गाऱ्हाण घालण्याचा कार्यक्रम भक्तिभावाने रोज सुरू आहे. मंदिराप्रमाणेच गल्लोगल्ली विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली असून, रेकॉर्ड डान्स, रांगोळी, भाषण, गायनासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम दररोज नऊ दिवस आखतात.
महिलानी केला ड्रेसकोड
बालचमू गड किल्ल्यांच्या बांधणी आणि सजावटीत गुंग झाले आहेत. दुर्गामाता दौडीचा शुभारंभ सोमवारी झाला. गल्लोगल्लीतून दौडीला मोठा प्रतिताद मिळत आहे. पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने मावळे पहाट जागवत असून, स्फूर्तीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना झाली असून, आता शारदोत्सवाला रंग भरू लागला आहे. यावर्षी गल्लोगल्लीच्या महिलानी ड्रेसकोड तयार करून नवरात्रीला एक वेगळीच शोभा आणली आहे. यामुळे गावात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे