For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्मा फुगडी स्पर्धेत नाविन्य ग्रुपची चमक

12:14 PM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
झिम्मा फुगडी स्पर्धेत नाविन्य ग्रुपची चमक
Advertisement

बेळगाव : धनंजय महाडिक युवा शक्ती व भागिरथी महिला संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये बेळगावच्या नाविन्य ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. गेली पंधरा वर्षे सविता इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सदर संघ मंगळागौर व झिम्मा फुगडी यांचे कार्यक्रम आयोजित करत आहे. या संघाला मायाप्पा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत दीडशेहून अधिक महिला संघांनी सहभाग नोंदवला होता. खासदार धनंजय महाडिक व मान्यवरांच्या उपस्थितीत बेळगावच्या नाविन्य ग्रुपला पारितोषिक देण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.