For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत नवीन, आर्या, श्रीनिवास विजेते

09:51 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत नवीन  आर्या  श्रीनिवास विजेते
Advertisement

बेळगाव : इंडियन डेंटल अशोंशियन, कर्नाटक राज्यस्तरीय आयोजन बेळगाव डेंटल असोशियन तर्फे आयोजन करण्यात आलेल्या टेनिस स्पर्धेत दुहेंरीत डॉ. नवीन व आर्या या जोडीने तर वरीष्ठ गटात एकेरीत डॉ. श्रीनिवास, खुल्या गटात आर्या यानी विजेतेपद पटकाविले. युनियन जिमखाना टेनिस सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योजक शिरीष गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शेटल फटका मारुन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 20 खेळाडूंनी भाग घेतला होता. याप्रसंगी आयडीएचे राज्यसचिव महेशचंद्रा, बेळगाचे अध्यक्ष डॉ. नवीन दोडवाड, सचिव डॉ. बिंदु होसमनी, डॉ. सुशांत बाझरे, दंतवैद्य सुमंत गोयल, डॉ. राधाकृष्ण खांडेकर, डॉ. जगदीश काडमण्णावर, डॉ. सचिन शिवनेकर, डॉ. सर्वेश युरोरागीन, डॉ. विश्वनाथ तेलकर, डॉ. अनुपम पाटील, मयुरी धाकोजी, नेत्रावती सबनिश, महेताबअली बंकापुरे, मधुसुदन मुरकुटे, समीर पोटे, आरुंदती पोटे, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे समन्वयक दीपक पवार आदी उपस्थित होते. या स्पर्धेत दुहेरीत अंतिम सामन्यात डॉ. नवीन व आर्या जोडीने तौसिफ व इंदूशेखर जोडीचा पराभव करून विजेतेपद मिळविले. वरिष्ठ गटात डॉ. श्रीनिवास यांनी डॉ. नविन यांच्या पराभव करुन विजेतेपद मिळfिवले. खुल्या गटात आर्याके डॉ. तौसिफचा पराभव करुन विजेतेपद मिळविले. विजेत्या खेळाडूंना आयडीएचे राज्य अध्यक्ष भरत एम.व्ही. यांच्या हस्ते देण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.