"नवा विद्यार्थी"कुमार साहित्य संमेलनाची दीपप्रज्वलनाने सुरुवात
न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे संमेलन ; मान्यवर अतिथींची उपस्थिती
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
आज गुरुवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे आयोजित करण्यात आलेल्या "नवा विद्यार्थी" कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सिंधुदुर्गातील जेष्ठ साहित्यिक तथा नामवंत कवी, स्तंभलेखक अजय कांडर भूषविणार आहेत.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या हस्ते आणि अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीसह मान्यवरांच्या उपस्थितीत "नवा विद्यार्थी" कुमार साहित्य संमेलनाची दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई गेली अनेक वर्षे सातत्याने आपल्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी खास विद्यार्थ्यांसाठी कुमार साहित्य संमेलन आयोजित करीत आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना साहित्यिकांना अनुभवता येते. अजय कांडर यांच्या सोबत मालवण येथील निबंध आणि कथाकार नागेश कदम. साहित्यिक रामचंद्र शिरोडकर, मनोहर परब, युवराज सावंत,जेष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आदि सिंधुदूर्ग साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.गेली 15 वर्षे अविरतपणे हे "नवा विद्यार्थी" कुमार साहित्य संमेलन सुरू आहे ही गौरवाची बाब आहे.