नटवर सिंह यांची प्रकृती बिघडली
06:22 AM Aug 01, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ जयपूर
Advertisement
देशाचे माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुंवर नटवर सिंह यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा आमदार जगत सिंह आणि कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत. नटवर सिंह हे निवृत्त आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकारी देखील आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article